🕒 1 min read
रत्नागिरी : आज औरंगाबादमधील नव्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री सुभाष देसाई, मंत्री एकनाथ शिंदे आदी नेते उपस्थित होते. यावेळी यावेळी केवळ घोषणा नाही, पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी करु, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
‘घरी बसून केलेल्या कामांचा शुभारंभ आणि भूमीपुजन आता होतेय. त्याची सुरवात औरंगाबाद म्हणून झाली,’ असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. तर, ‘मला विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगानं करायचा आहे. फक्त भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाहीये. काम पूर्ण करायला आलोय,’ असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी जनतेला दिलं आहे.
गेल्या काही वर्षांत जे खड्डे पडले ते बुजवायचे आहेत, रस्ते चांगले होतील. मी भूमिपूजन करुन थांबणार नाही तर न संगता कामाची पाहणी करण्यासाठी येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग 1 मे ला सुरू करणार असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर भाजपने टीकास्त्र सोडलं आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनांची खिल्ली उडवली आहे. ‘नेहमीप्रमाणे कुठलाही कार्यक्रमाला भाषण करताना त्या जिल्ह्याचे २ प्रश्न ‘मी ते सोडवणारच’ सांगून मुंबईला निघून जायचं हे उद्धव ठाकरे यांची जुनी पद्धत. आज पण औरंगाबाद मध्ये मी पाणी देतो आणि कचरामुक्त करतो सांगून निघून गेले. उद्धव ठाकरे जे काम हाती घेतात ते पूर्ण कधीच करत नाही.’ असा घणाघात राणेंनी केला आहे.
नेहमीप्रमाणे कुठलाही कार्यक्रमाला भाषण करताना त्या जिल्ह्याचे २ प्रश्न 'मी ते सोडवणारच' सांगून मुंबईला निघून जायचं हे उद्धव ठाकरे यांची जुनी पद्धत. आज पण औरंगाबाद मध्ये मी पाणी देतो आणि कचरामुक्त करतो सांगून निघून गेले. उद्धव ठाकरे जे काम हाती घेतात ते पूर्ण कधीच करत नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 12, 2020
महत्वाच्या बातम्या
- घरी बसून केलेल्या कामांचा शुभारंभ होतोय; ठाकरेंचा विरोधकांना सणसणीत टोला
- सामन्यांच्या खिशाला कात्री, पेट्रोल नव्वदीपार!
- ‘पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि…’
- कौतुक तर होणारच: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ कृतीने दिसून आला त्यांचा साधेपणा
- डिसेंबरमध्येच लसीला परवानगी मिळेल, तर…; आदर पुनावालांनी केला मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
