Share

‘पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि…’

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून विरोधकांवर निशाणा साधण्यात आला आहे.

‘पवार 80 वर्षांचे होत आहेत त्याचवेळी मोदींचे प्रचंड बहुमत असूनही लोकांच्या मनात अशांतता आहे. शेतकरी, कष्टकरी दिल्लीस वेढा घालून पंधरा दिवसांपासून बसला आहे. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कमजोर झाले आहे. लोकांना आकर्षित करील असे नेतृत्व आता उरलेले नाही. अशा वेळी महाराष्ट्रात भाजपचा उधळलेला घोडा रोखून शिवसेना, काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीची स्थापना करणारे, त्या सरकारचे नेतृत्व एका समझदारीने उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविणारे शरद पवार देशातील मोठ्या वर्गास आकर्षित करीत आहेत. साताऱ्याच्या भरपावसातील सभेत विजेचा कडकडाट व्हावा तसे शरद पवार अवतरले.’ शिवसेनेनं असा पवारांवर कौतुकाचा वर्षाव करतानाच भाजपला टोला लगावला आहे.

यानंतर, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर विखारी टीका केली आहे. ‘हो तर, पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि कधी कुठे भूकंप येईल याची काय शाश्वती?’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!