मुंबई : सद्या महागाईमुळे सामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कोरोनाचा प्रसार देशात होताच, या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात अचानकपणे टाळेबंदी करण्यात आली. या ताळेबंदीमुळे अनेक व्यवसाय डबघाईला आले. त्यामुळे सामन्यांना आपला रोजगार गमवावा लागला. २०२० चं स्वर्गीय डॉ. अब्दुल कलाम यांचं व्हिजन पूर्ण करू पाहणाऱ्या मध्यमवर्गाला तर इकडं आड तिकडं विहीर अशा प्रस्थितीमधून जावं लागत आहे.
कर्जाचा बोजा वाढलेल्या जनतेला आता पेट्रोलच्या महागाईचा फटका सोसावा लागत आहे. हळूहळू वाढ होत पट्रोल आता नव्वदी पार गेलं आहे. त्यामुळे आर्थिक हालापेष्टा वाढतच आहेत. आज मुंबईमध्ये ९०.३४ रुपये लिटर इतका पेट्रोलचा भाव नोंदवण्यात आला.
तर, नांदेडमध्ये सर्वाधिक ९२.७५ रुपये प्रति लिटर मोजावे लागत आहेत. उर्वरित महाराष्ट्रातही पेट्रोल नव्वदीपारच आहे. पुण्यातही पेट्रोल ९०.३६ रुपये प्रति लिटर इतके आहे. दरम्यान, नजीकच्या काळात इंधनाचे आणखी दार वाढण्याची परिस्थिती असून डिझेलच्या किंमतीतही वाढ होत असल्याने शेतकऱ्यांसह मालवाहुतकीवर याचा परिणाम होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडीला पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं हे हास्यास्पद!, अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार’
- शेतकरी आंदोलनाबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेला मारले जोडे
- ‘पवार म्हणजे महाराष्ट्राला वैचारिकदृष्ट्या ८०० वर्ष पुढे घेऊन गेलेलं महायुग’
- ‘आजही संकटात असलेल्यांना शरद पवारांमध्ये देवमाणूस दिसतो’
- ‘ठाकरे सरकार आल्या आल्या नाईट क्लबवाले त्यांच्या बापाचं सरकार असल्यासारखे वागू लागलेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
