औरंगाबाद : आज औरंगाबादमधील नव्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री सुभाष देसाई, मंत्री एकनाथ शिंदे आदी नेते उपस्थित होते. यावेळी यावेळी केवळ घोषणा नाही, पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी करु, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
हा कार्यक्रम एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. ते कारण म्हणजे, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंचं आगमन झाल्यानंतर त्यांनी असं काही कृत्य केलं की उपस्थितांनी तर त्यांचं कौतुक केलंच सोबत उभ्या महाराष्ट्राला त्यांच्या साधेपणाचा दर्शन झालं.
कोरोनाची नियमावली पाळून व योग्य खबरदारी घेऊन आज औरंगाबादमध्ये नव्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अनेक दिग्गज मंत्री व नेते उपस्थित राहिले होते. मंचावर उद्धव ठाकरेंची खास व मोठी नक्षीदार खुर्ची ठेवण्यात आली होती. मात्र, मंचावर येताच उद्धव ठाकरेंनी नम्रपणे ती खुर्ची हटवण्यास सांगितले व मंत्री व अधिकारी मान्यवरांसाठी ठेवण्यात आलेल्या खुर्चीप्रमाणेच खुर्ची ठेवण्यास सांगितले.
सर्वांप्रमाणेच खुर्ची ठेवण्यात आल्यानंतर ते त्यावर विराजमान झाले. या कृतीमुळे सामान्य नागरिक देखील कौतुक करू लागले. मागील वर्षी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी रंगलेलं नाट्य पाहायला मिळालं होतं. मात्र, ठाकरेंच्या या कृतीमुळे मुख्यमंत्रीपदावर असताना देखील साधेपणा दिसून आल्याने वाह वाह! होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- घरी बसून केलेल्या कामांचा शुभारंभ होतोय; ठाकरेंचा विरोधकांना सणसणीत टोला
- सामन्यांच्या खिशाला कात्री, पेट्रोल नव्वदीपार!
- ‘पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि…’
- ‘आजही संकटात असलेल्यांना शरद पवारांमध्ये देवमाणूस दिसतो’
- डिसेंबरमध्येच लसीला परवानगी मिळेल, तर…; आदर पुनावालांनी केला मोठा खुलासा

