Share

डिसेंबरमध्येच लसीला परवानगी मिळेल, तर…; आदर पुनावालांनी केला मोठा खुलासा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : गेले वर्षभर कोरोनाने जगात हाहाकार माजवला आहे. जवळजवळ सर्वच देशांत या कोरोनाचा शिरकाव झाला आणि लाखो लोकांना आपला प्राण गमवावा लागला. कोणतंच प्रभावी औषध नसल्यानं या रोगाची तीव्रता वाढली होती. या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी जणू सर्व जगचं थांबल होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासह हैद्राबाद व अहमदाबादमधील लस संशोधन करणाऱ्या कंपन्यांना भेट दिली होती. यानंतर, नेमकी लस कधी येणार? सर्वसामन्यांना परवडणार का? प्राधान्यक्रम कसा असेल? कितपत उपायकारक असेल? दुष्परिणाम असतील का? हे व असे कित्येक प्रश्न निर्माण झाले आहेत.

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी लवकरच खुशखबर मिळेल असे संकेत दिले आहेत. भारतातही तीन औषध कंपन्यांनी आपल्या कोरोना लशीला आपत्कालीन मंजुरी मिळावी यासाठी अर्ज केले आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया हि त्यापैकी एक संस्था आहे. सीरमनं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनका कंपनीसह मिळून ही लस तयार केली आहे. लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी द्यावी यासाठी DCGI कडे अर्ज केला आहे. याच वर्षाच्या अखेरपर्यंत ही मंजुरी मिळेल आणि पुढील वर्षाच्या पहिल्याच महिन्यात कोरोना लशीकरण सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

ते म्हणाले, ‘आम्हाला इमर्जन्सी लायसेन्स चालू महिन्याच्या अखेरपर्यंत मिळेल; पण लशीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठीची परवानगी नंतर मिळेल. नियंत्रक यंत्रणेची परवानगी मिळाली, तर भारताचा कोरोना लशीकरण कार्यक्रम जानेवारी 2021 मध्ये सुरू होऊ शकतो, असा विश्वास आम्हाला आहे’ यासंदर्भात न्यूज १८ लोकमतने वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!