Share

घरी बसून केलेल्या कामांचा शुभारंभ होतोय; ठाकरेंचा विरोधकांना सणसणीत टोला

Published On: 

औरंगाबाद : भाजप आणि शिवसेना यांची युती सुमारे दोन दशकांहून अधिकची होती. मात्र, गेल्यावर्षी विधानसभांच्या निकालानंतर काही मागण्यांवरून मतभेद झाल्याने शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. केंद्रातील एनडीएमधून देखील शिवसेनेनं बाहेर पडत मोदी सरकारचा पाठींबा काढून घेतला.

यानंतर, गेल्या वर्षभरात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात अनेक वाद सुरु असून भाजपने शिवसेनेला चांगलंच लक्ष्य केलेलं पाहायला मिळालं. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे उद्धव ठाकरे विराजमान असून भाजपने त्यांच्या कारभारावर चांगलीच आगपाखड केली होती. कोरोनाकाळापासून मुख्यमंत्री हे घरातच बसून मस्त तर जनता मात्र त्यांच्या प्रश्नांनी त्रस्त आहे अशी टीका भाजप नेत्यांनी केली होती.

आज औरंगाबादमधील नव्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी विरोधकांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टीकांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘घरी बसून केलेल्या कामांचा शुभारंभ आणि भूमीपुजन आता होतेय. त्याची सुरवात औरंगाबाद म्हणून झाली,’ असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. तर, ‘मला विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगानं करायचा आहे. फक्त भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाहीये. काम पूर्ण करायला आलोय,’ असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी जनतेला दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!