🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर पोट निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणालाच वापरता येणार नाहीय. एवढंच नाही तर कोणत्याच गटाला शिवसेना पक्षाचं नावही लावता येणार नसल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अशातच शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत, ‘जिंकून दाखवणारच’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी हा फोटो आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे.
View this post on Instagram
तसेच, आता दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नवीन नावाची आणि नवीन निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. सोमवारी, 10 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेश आयोगाकडून देण्यात आला आहे.
शिवसेना पक्षाचे नेते मिलिंद नर्वेकर यांनी एक फोटो शेअर करत ठाकरे गटाचे चिन्ह काय असणार आहे, याची माहिती दिली आहे.मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये वाघ असून त्या वाघाच्या मागे जाळ असल्याचं दिसून येतं आहे. एवढंच नाहीतर त्यावर फोटोवर आमचे चिन्ह श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे असंही लिहिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Breaking News। नाशिकमध्ये अजून एक दुर्घटना; गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग
- Mobile Hack | तुमचा मोबाईल देखील वारंवार गरम होत असतो का?, मग ‘या’ टिप्स करा फाॅलो
- Jaidev Thackeray | जयदेव ठाकरे यांच्या मुलाचा उद्धव ठाकरेंना पाठींबा ; ठाकरे पिता-पुत्रामध्ये मतभेद!
- Shivsena | धनुष्यबाण कोणाला? दिल्लीत वेगवान घडामोड, निवडणूक आयोगाची तातडीची बैठक
- Health Tips | ‘या’ नैसर्गिक गोष्टी वापरून मजबूत करा Immunity सिस्टीम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
