🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: आजकाल मोबाईल ही काळाची गरज राहिलेली नसून व्यसन बनत चाललेले आहे. आपण मोबाईल पासून आता फारसे लांब राहू शकत नाही. त्याचवेळी मोबाईलमुळे आपले जीवन सुद्धा खूप सोपे झाले आहे. घरबसल्या आपण मोबाईलच्या मदतीने अनेक कामे अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. पण मोबाईलच्या अतिवापरामुळे मोबाईल गरम होण्याचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मोबाईल गरम होण्यापासून कसा वाचवता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला आज माहिती सांगणार आहोत. चला, जाणून घेऊया त्याबद्दल:
मोबाईल गरम होण्यापासून कसा वाचवता येईल?
मोबाईलचा अतिवापर वापर टाळा
मोबाईल गरम होण्याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईलचा अतिवापर. आजकाल आपल्याला आपला मोबाईल सतत आपल्या हातात लागतो. पण मोबाईल हे एक यंत्र आहे आणि त्या यंत्राला विश्रांती दिली पाहिजे. तुम्ही तुमच्या फोनला थोडीशी विश्रांती दिल्यास, तुमचा फोन गरम होण्यापासून वाचू शकतो.
मोबाईल मध्ये ॲप्सचा अतिरेक वापर टाळा
बराच वेळा वापर नसताना अनेक ॲप्स आपल्या फोनमध्ये असतात. फोन मध्ये मुबलक प्रमाणात रॅम आणि इंटरनल स्टोरेज उपलब्ध झाल्यास आपण असे करू लागतो. पण याचा परिणाम थेट तुमच्या मोबाईलवर होऊ लागतो, तुमचा मोबाईल गरम होऊ लागतो. त्यामुळे उपयोग न होणारे ॲप्स मोबाईल मध्ये ठेवू नका.
कव्हरमुळे मोबाईल गरम होऊ शकतो
अनेक वेळा मोबाईल कव्हरमुळे फोन गरम होऊ लागतो. साधारणता चायनीज कंपनीच्या फोन मध्येही समस्या जास्त दिसून येते. कव्हर मुळे फोनचे गरम होणे टाळण्यासाठी मोबाईलला ओपन कव्हर लावा. तरीही तुमचा मोबाईल सतत गरम होत असेल तर कव्हर काढून टाका. कव्हर काढून टाकल्यामुळे फोन मधून उष्णता लवकर बाहेर पडते.
हाय ब्राईटनेसमुळे फोन गरम होण्याची समस्या वाढू शकते
जर तुमचा फोन गरम होत असेल तर त्याचे कारण तुमच्या मोबाईलची ब्राईटनेस देखील असू शकते. फोनची जितकी जास्त ब्राईटनेस असेल तितका लवकर फोन गरम व्हायला लागतो. त्यामुळे तुमच्या मोबाईलची ब्राईटनेस कमी ठेवायचा प्रयत्न करा.
सतत इंटरनेट वापरामुळे देखील मोबाईल गरम होऊ शकतो
सततच्या इंटरनेट वापरामुळे फोन गरम होऊ लागतो. ज्या मोबाईलमध्ये रॅम कमी असतो त्यांनाही समस्या अधिक जाणवते. कारण इंटरनेटचा वापर करत असताना रॅमचा वापर जास्त होतो. त्यामुळे तुमचा फोन गरम व्हायला लागतो. त्यामुळे उपयोग नसताना इंटरनेट बंद ठेवावे.
मोबाईलच्या बॅटरी मुळे देखील फोन गरम होऊ शकतो
मोबाईल गरम होण्याचे मुख्य कारण बॅटरीचे खराब होणे असू शकते. लिथियम बॅटरी खूप नाजूक असतात, त्यामुळे कधीकधी फोनला आग लागण्याच्या घटना देखील घडत असतात. त्यामुळे फोन चार्जिंग करताना शक्यतो ओरिजनल केबलचाच वापर करावा. त्यामुळे चार्जिंग ही व्यवस्थित होते आणि फोन देखील गरम होत नाही.
महत्वाच्या बातम्या
- Jaidev Thackeray | जयदेव ठाकरे यांच्या मुलाचा उद्धव ठाकरेंना पाठींबा ; ठाकरे पिता-पुत्रामध्ये मतभेद!
- Shivsena | धनुष्यबाण कोणाला? दिल्लीत वेगवान घडामोड, निवडणूक आयोगाची तातडीची बैठक
- Health Tips | ‘या’ नैसर्गिक गोष्टी वापरून मजबूत करा Immunity सिस्टीम
- Uday Samant | दसरा मेळाव्यात भाषण करू न दिल्यामुळे शिंदे गटात नाराजी? उदय सामंत म्हणाले…
- Skin Care Tips | कॉफी फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यावर मिळतील ‘हे’ फायदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
