Share

Jaidev Thackeray | जयदेव ठाकरे यांच्या मुलाचा उद्धव ठाकरेंना पाठींबा ; ठाकरे पिता-पुत्रामध्ये मतभेद!

Published On: 

मुंबई : ६ ऑक्टोबर रोजी शिंदे आणि ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे उपस्थित नव्हते .मात्र, शिंदे गटाच्या मेळाव्याला दोघेही उपस्थित होते. यामुळे राजकीय वर्तुंळात अनेक चर्चा रंगल्या जात आहेत. यासंदर्भात जयदेव ठाकरे यांचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कुणी कुणाच्या सभेत जायचं हे आपण ठरवू शकत नाही. प्रत्येकाला स्वतःच वेगळं मत असतं. माझे आई वडील एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला का गेले हे तुम्ही त्यांना विचारा” अशी प्रतिक्रिया जयदीप ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यांचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणार असल्याचं म्हंटल आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे पिता-पुत्रांमध्ये मतभेद असल्याचं उघड झालं आहे. मी उद्धव काकांच्या बाजूने आहे. त्यांचे माझ्या आईशी देखील चांगले संबंध आहेत. मात्र आईने आणि वडिलांनी शिंदेंच्या मेळाव्याला जाणं हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं जयदीप ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

भविष्यात जर आपल्यावर शिवसेनेनं जबाबदारी दिली, तर ती पार पाडण्यासाठी निश्चितच काम करेन, असंही जयदीप ठाकरेंनी सांगितलं आहे. “मी या घराचा सर्वात मोठा नातू आहे. मला माझ्या आजोबांबद्दल, उद्धव काकांबद्दल, आदित्यबद्दल प्रचंड आदर आहे. आपल्यासमोरचं हे चित्र फार विचित्र आहे. अशा वेळी माझ्या कुटुंबासोबत असणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी उद्धव काकांच्या सभेला गेलो”, असं जयदीप ठाकरे म्हणाले.

“पुढे-मागे जर मला संधी मिळाली किंवा त्यांना वाटलं की माझ्यावर एखादी जबाबदारी सोपवावी, तर ती मी १०० टक्के स्वीकारेन आणि पक्षाला वाढवण्यासाठी नक्कीच मदत करेन. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत असही ते म्हणाले. दरम्यान, या संदर्भात काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!