टीम महाराष्ट्र देशा: आजकालच्या बदलत्या वातावरणामध्ये लोकांची इम्युनिटी (Immunity) सिस्टीम कमकुवत होत चालली आहे. यामध्ये कधी थंडी कधी पाऊस तर कधी ऊन वेगवेगळ्या रोगांना आमंत्रण देत असते. वाढत्या डासांमुळे वाढत्या केरकचऱ्यामुळे डेंगू आणि मलेरियाचा धोकाही वाढत चाललेला आहे. त्याचबरोबर वाढत्या उष्णतेमुळे सुद्धा व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. पण यासर्वांमध्ये जर आपली इम्युनिटी सिस्टीम मजबूत असेल तर आपण या सर्व रोगांपासून लांब राहू शकतो. यासाठी आपण आपल्या दैनंदिन आहारात पौष्टिक भाज्या आणि फळांचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे आपली इम्युनिटी सिस्टीम मजबूत होऊन आपण निरोगी राहू शकतो.
इम्युनिटी सिस्टीम मजबूत करण्यासाठी आपल्या आहारामध्ये पुढील गोष्टींचा समावेश करा :
दही
दही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये मुबलक प्रमाणात लॅक्टिक ऍसिड आढळते. त्याचबरोबर दह्यामध्ये आढळणारे बॅक्टेरिया अन्नपचवण्यास मदत करतो. त्यामुळे आपली इम्युनिटी सिस्टीम चांगली होऊन आपण निरोगी राहू शकतो.
पपईची पाने
शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपईचे पाने हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. 2009 मध्ये मलेशिया येथे झालेल्या संशोधनात असे आढळून आले होते की पपईचे पान डेंगू तापावरील सर्वोत्कृष्ट औषध आहे. त्यामुळे इम्युनिटी सिस्टीम वाढवण्यासाठी पपईच्या पानांचा वापर करावा.
गुळवेल
व्हायरल तापासाठी गुळवेलाच्या पानांचा रस एक रामबाण उपाय आहे. गुळवेलाची पाने पाण्यात टाकून तिचा काढा करून प्यावी. या काढयामुळे डेंगूचे संकट टळते. त्याचबरोबर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास देखील मदत होते.
डाळिंब
भरपूर पोषण घटक असलेले डाळिंब आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. डाळिंबामध्ये मुबलक प्रमाणात आयरन आढळते. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्स वाढवण्यात डाळिंब महत्वाचे काम करते. डाळिंब खाण्यासोबतच आपण डाळिंबाचा रस देखील पिऊ शकतो.
बीट
बीटामध्ये मुबलक प्रमाणात अँटी अँक्सीडेंट आढळते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीटचा मुख्यतः उपयोग केला जातो. बीटाचे नियमित सेवन केल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवून आपण निरोगी राहू लागतो.
किवी
किवीमध्ये विटामिन सी आणि विटामिन ई मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे नियमित किवीचे सेवन केल्याने आपले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. सकाळ संध्याकाळ एक किवी खाल्ल्याने प्लेटलेट्स सुद्धा वाढतात.
टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या
- Uday Samant | दसरा मेळाव्यात भाषण करू न दिल्यामुळे शिंदे गटात नाराजी? उदय सामंत म्हणाले…
- Skin Care Tips | कॉफी फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यावर मिळतील ‘हे’ फायदे
- Devendra Fadnavis | “सत्तास्थापनेवेळी फडणवीस राज्यपालांना भेटलेच नाहीत” ; राज्यपाल कार्यालयाने दिली खोटी माहिती माहिती
- Ajit Pawar । “शिंदे दिल्लीला गेले आणि हात हलवत परत आले”; अजित पवार यांची खोचक टीका
- Health Tips | अतिप्रमाणात गरम पाणी पीत असाल तर ते आताच थांबवा, कारण आरोग्यासाठी ते हानिकारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

