मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्तेचा मुद्दा आज विधिमंडळात उपस्थित केला. आदिवासी समाजाचे डेलकर हे सातवेळा खासदार म्हणून निवडून आले. त्यांना प्रचंड मरण यातना देण्यात आल्या. आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केले पण शेवटी मुंबईत येऊन जीवनयात्रा संपवली.
आता मोहन डेलकरांच्या कुटुंबानं मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. राज्य सरकार आम्हाला न्याय देईल, अशी भावना डेलकर कुटुंबीयाने व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले कि, ‘मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली असून त्यांनी सुसाईट नोटमध्ये त्याचा कारण ही लिहिलं आहे. दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफ्फुल खेडा पटेल यांनी त्रास दिल्याचा उल्लेख ही नोटमध्ये करण्यात आला आहे. संसदेतही याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्यांचा छळ होत असल्याने डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली.
दादरा आणि नगर हवेलीत आत्महत्या केली असती तर न्याय मिळाला नसता, असं म्हणत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार मला न्याय देतील म्हणून त्यांनी आत्महत्या मुंबईत करत असल्याचा उल्लेख त्या चिठ्ठीत आहे. शिवाय डेलकर यांच्या पत्नी कामलाबेन डेलकर, त्यांचा मुलगा अभिनव डेलकर आणि मुलगी या तिघांनी आमची भेट घेतली. आमच्या जीवाला धोका असल्याची मागणी त्यांनी आज केली आहे. या संपूर्ण घटनेत STI चौकाशी राज्य सरकार करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रध्दांजली म्हणून पदयात्रा
- कोरोनाने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम थांबवली
- खा.जलील यांच्या कार्यालयामागील इमारत जमीनदोस्त
- रुग्णसंख्या वाढली! सोयगावचे कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू
- पाचशे रुपयांवरून दोन पोलिसांत तुंबळ हाणामारी


