Share

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रध्दांजली म्हणून पदयात्रा

Published On: 

अंबाजोगाई : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रध्दांजली म्हणून पदयात्रा काढण्यात येणार आहे. औंढा नागनाथ ते चिलगव्हाण अशी १२५ किलोमीटरची पदयात्रा करण्याचा निर्धार डॉ. राजीव बसरगेकर, रामकिसन रुद्राक्ष, सुभाष कच्छवे आदींनी व्यक्त केला आहे. ही शेतकरी सहवेदना यात्रा ११ मार्च रोजी औंढा नागनाथ येथून निघणार आहे. ती १९ मार्च रोजी चिलगव्हाण येथे पोहचणार आहे.

नऊ दिवसांच्या या पदयात्रेत ते अनेक गावातून जाणार आहेत. दिग्रस कऱ्हाळे, हिंगोली, खानापूर, कळमनुरी, मालेगाव, बाभळी, शेंबाळ पिंपरी, मुळावा, पळशी, कृषी महाविद्यालय मरसुळ, उमरखेड, सुकळी, नांदगव्हाण, बिजोरा, मुडाना, महागाव, चिलगव्हाण या मार्गाने ही पदयात्रा जाणार आहे.पद यात्रेत कोरोना बाबतचे सर्व निकष तंतोतंत पाळले जाणार आहेत.

दि.१९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे यांच्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे समाजाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, दरवर्षी १९ मार्च रोजी लाखो संवेदनशील नागरिक एक दिवस अन्नत्याग करत आसतात. या वर्षीही हजाराहून अधिक शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. याही वर्षी १९ मार्च रोजी नागरिकांनी अन्नत्याग करून आपल्या भावना व्यक्त कराव्यात असे आवाहन अमर हबीब यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!