Share

Uddhav Thackeray VS Devendra Fadnavis : यंदाचा विठ्ठल पूजेचा मान कोणाला?; चर्चांना उधान

Published On: 

मुंबई: महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार डगमगताना दिसून येत आहे. त्यात सध्या यंदाचा विठ्ठल पूजेचा मान कोणाला मिळणार या मुद्द्यावर चर्चा रंगत आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) की उद्धव ठाकरे अशा चर्चांना उधान येत आहे.

आषाढी एकादशीच्या वारीला सुरुवात झाली आहे. त्यात राज्यातील राजकारणात सत्ता परिवर्तनाचे वारे वाहताना दिसून येत आहेत. दरम्यान शिवसेनेचे बंडखोर आमदार बुधवारी पहाटे चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे पोहोचले. महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सुरतहून गुवाहाटी गाठल्यानंतर आपल्याला ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. मात्र, महाराष्ट्राचे ४१ बंडखोर आमदार गुवाहाटीला पोहोचले असून एका आलिशान हॉटेलमध्ये थांबल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यापैकी ३४ शिवसेनेचे तर सात अपक्ष आमदार आहेत.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी पक्षाविरोधात बंड करून सुरतमधील हॉटेल गाठल्यानंतर मंगळवारी पक्षाने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये हलवले. पक्षाच्या आमदारांना मुंबईतील विविध हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. आमदारांचे अपहरण होण्याच्या भीतीने हे कृत्य करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!