Share

Chhagan Bhujbal : पंतप्रधान देहूत संत तुकारामांच्या भेटीला आले अन् एकनाथाला घेऊन गेले – छगन भुजबळ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला दणका दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने, पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आलेत. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ होते. शिंदे शिवसेनेच्या १३ आमदारांसह काल गुजरातमध्ये होते. एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली आहे. तसेच शिंदेच्या नाराजीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदेंच्या या भूमिकेवर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान देहूत संत तुकारामांच्या भेटीला आले अन् एकनाथाला घेऊन गेले”, अशी तिखट प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी दिली आहे.

पवारांची राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक –

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. शरद पवार राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. आमचे सरकार पाडण्याचा हा तिसरा प्रयत्न असल्याचे पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!