🕒 1 min read
नवी दिल्ली : शिवसेना कुणाची? तसेच शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत देखील सुनावणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालय आज आदेश देऊ शकते. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर याप्रकरणी ७ सप्टेंबर रोजी शेवटची सुनावणी झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. दोन्ही गट पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा करत आहेत. दरम्यान आज शिंदे गटाच्या वकिलांनी महत्वाचा युक्तिवाद केला.
निवडणूक आयोगाकडे जाण्याचा शिंदे गटाला अधिकार आहे. कारण विधानसभा अध्यक्षांनी त्यांना गटनेता म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे ते निवडणूक आयोगाकडे गेले, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकिल नीरज कौल यांनी केला आहे. ठाकरे गटाकडे बहुमत नाही, आमच्याकडे बहुमत आहे, असे कौल म्हणाले.
बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा-
ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. सभागृहातील बहुमत गमावल्याचा हा मोठा पुरावा असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच आमदारांची अपात्रता आणि पक्षातील अंतर्गत वादावरील निवडणूक आयोगाचे अधिकार यांच्यातील संभाव्य संबंध मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासोबत संपले आहेत, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणे महागात पडणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नीरज कौल कोर्टात काय म्हणाले?-
दरम्यान, शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेचा निर्णय व्हावा, असा युक्तिवाद न्यायालात केला. सध्या विधानसभा अध्यक्ष नियुक्त आहेत, असे कौल यांनी म्हटले आहे. आम्ही स्वताहून पक्ष सोडला नाही, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी याबाबत निर्णय घ्यावा, असे कौल म्हणाले. यावेळी कौल यांनी समाजवादी पक्षाचा दाखला दिला. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर राहूल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्ष करण्यात आले आहे.
तसेच कोणाकडे कीती पदाधिकारी आहेत, हे पाहावे लागेल, असा युक्तिवाद कौल यांनी केला आहे. हे निवडणूक आयोगाला लक्षात घ्यावा लागेल. चिन्हाचा निर्णय देखील निवडणूक आयोग ठरवू शकतो, असे कौल म्हणाले. तसेच विधानसभा अध्यक्ष राजकीय पैलूंची चौकशी करू शकत नाहीत, असं कोर्टानं म्हटलेलं आहे, याची आठवण कौल यांनी करुन दिली.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips | तुमच्या हाताची बोट दुखत असतील तर करा ‘ हे ‘ उपाय
- Dadasaheb Phalke Award | सिने सृष्टीतील तारिका आशा पारेख यांना दिला जाणार ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’
- Uddhav Thackeray | “कितीही अफझल खान आले, तरी…”, उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका
- Shivsena VS Shinde | शिंदे गटाकडून नीरज कौल यांचा कोर्टात महत्वाचा युक्तीवाद, समोर ठेवले ‘हे’ मुद्दे
- KTM New Launch | KTM ने लाँच केले ‘या’ दोन बाईकचे जीपी एडिशन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
