Share

KTM New Launch | KTM ने लाँच केले ‘या’ दोन बाईकचे जीपी एडिशन

Published On: 

🕒 1 min read

बाईक आणि बाईक रेस हा देशातील तरुण मंडळींचा आवडता विषय आहे. आणि याच बाईक रेस मधली सर्वात लोकप्रिय बाईक रेस म्हणजे मोटो जीपी (Moto GP) ज्याची झलक आपल्याला पुढच्या वर्षी बघायला मिळणार आहे. या कारणामुळे टू व्हीलर कंपनी त्यांच्या मोटो जीपी बाईक सतत लाँच करत असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक निर्माती कंपनी KTM ने आपल्या दोन बाईक्सची मोटो जीपी एडिशन लाँच केले आहेत. या सुपर स्पोर्ट्स बाईक मध्ये RC 390 आणि RC 200 यांचा समावेश आहे. चला, या बाईक्स बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

इंजिन आणि परफॉर्मन्स

KTM RC 200 ला 199cc लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन २५.४ एचपीची कमाल पॉवर आणि १९.५ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. तर KTM RC 390 मध्ये 373cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे. हे इंजिन 43 hp चा जास्तीत जास्त पॉवर आउटपुट आणि 37 Nm चा पीक टॉर्क निर्माण करते. दोन्ही बाईकमध्ये 6-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्स आहे.

किंमत

KTM च्या नवीन RC 390 GP एडिशनची एक्स-शोरूम किंमत 3,16,070 रुपये आहे. तर RC 200 GP एडिशनची एक्स-शोरूम किंमत 2,14,688 रुपये आहे. या दोन्ही बाइक्सचा लुक अतिशय आकर्षक असून बाइक्स प्रेमींना या अधिक आकर्षित करतील.

लुक

KTM च्या या दोन्ही बाईक सिग्नेचर ऑरेंज कलरमध्ये आहेत. तसेच, त्यावरील काळ्या रंगाचे स्टिकर्स बाइकला आणखीन आकर्षक बनवत आहे. बाकी गोष्टींमध्ये या बाईक सारख्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Cars And Bike

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या