🕒 1 min read
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्षावर सुनावणी होतं आहे. अशातच नीरज कौल यांनी एकनाथ शिंदे यांचा युक्तिवाद मांडला आहे. यावेळी त्यांनी अनेक विधानं केली आहेत. लंच ब्रेक नंतर आता सुनावणीला पुन्हा सुरुवात झाली असून अनेक मुद्दे कौल मांडत असल्याचं समोर येतं आहे. लंचब्रेक पूर्वी कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांचे मुद्दे मांडले होते.
आमदारांना अपात्र ठरवणं पक्षाच्या आधिकारात येत नसल्याचा मुद्दा कौल यांनी मांडला आहे. एवढंच नाही उद्धव ठाकरे यांच्या वेळी शिवसेनाला बहुमत नव्हतं असं देखील त्यांनी सांगितलं आहे.
निवडणूक चिन्ह आमदारांची मालमत्ता नाही, तसेच निवडणूक आयोगाकडून चिन्ह वाटप केलं जातं, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अधिकारात हस्तक्षेप होत असल्याचं कौल म्हणाले. त्यामुळे निवडणूक आयोगानेच याचा निर्णय घ्यावा अशी भूमिका शिंदे गटाकडून मांडण्यात येत आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत बंड करुन उद्धव ठाकरे यांना झटका दिला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एवढ्यावरच एकनाथ शिंदे शांत न राहता त्यांनी थेट पक्षावरचं म्हणजेच धनुष्यबाण चिन्हावर देखील दावा केला. त्यामुळे हा वाद कोर्टात गेला असून शिवसेना नेमकी कोणाची यावर सुनावणी सुरु आहे. आता याच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips | महिलांनो थकवा आणि अशक्यापणा दूर करायचा असेल तर करा ‘या’ गोष्टींचा करा तुमच्या आहारात समावेश
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ‘या’ तारखेला होणार सुनावणी
- Tata New Vehicles Launch | टाटा मोटर्सने केले तीन नवीन पिक-अप वाहने लाँच
- Atul Bhatkhalkar | “… करण्यासाठीच शाळेत सरस्वतीचे, शारदेचे फोटो असतात” छगन भुजबळ यांना अतुल भातखळकरांचं प्रत्युत्तर
- Viral Video | ‘त्या’ चिमुकल्याच्या आवाजाची दखल थेट अजय-अतुलने घेतली ; चंद्रा गाण्यामुळे झाला होता व्हिडिओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
