🕒 1 min read
मुंबई : एकीकडे सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्षावर सुनावणी होतं आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून ठाकरेंनी महत्त्वाचं विधान केलं.
उद्धव ठाकरे यांची अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्ष टीकाः
आई भवानीचा आशीर्वाद असल्यानंतर कितीही अफझल खान आले, तरी मला पर्वा नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. न्याय आपल्याला मिळणार आणि मिळालाच पाहिजे. न्यायदेवतेवर आणि आई भवनाची माझा विश्वास आहे, असं देखील त्यांनी सुनावणीच्या पार्श्वभूमीवर म्हटलं आहे.
यादरम्यान, दसऱ्याला आपण भेटणारच आहोत, एक चांगली सुरुवात झाली असून दुर्गा भवानीच्या दर्शनाला मी येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
कोर्टात सुनावणी सुरुः
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत बंड करुन उद्धव ठाकरे यांना झटका दिला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एवढ्यावरच एकनाथ शिंदे शांत न राहता त्यांनी थेट पक्षावरचं म्हणजेच धनुष्यबाण चिन्हावर देखील दावा केला. त्यामुळे हा वाद कोर्टात गेला असून शिवसेना नेमकी कोणाची यावर सुनावणी सुरु आहे. आता याच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena VS Shinde | शिंदे गटाकडून नीरज कौल यांचा कोर्टात महत्वाचा युक्तीवाद, समोर ठेवले ‘हे’ मुद्दे
- KTM New Launch | KTM ने लाँच केले ‘या’ दोन बाईकचे जीपी एडिशन
- Thackeray vs Shinde | “विधानसभा अध्यक्ष राजकीय पैलूंची…” ; शिंदे गटाचे वकील कोर्टात काय म्हणाले?
- Health Tips | महिलांनो थकवा आणि अशक्यापणा दूर करायचा असेल तर करा ‘या’ गोष्टींचा करा तुमच्या आहारात समावेश
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ‘या’ तारखेला होणार सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
