Share

Dadasaheb Phalke Award | सिने सृष्टीतील तारिका आशा पारेख यांना दिला जाणार ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’

Published On: 

भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या सन्मानार्थ दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. हा भारतीय सिनेमा सृष्टीमधील सर्वात मोठा सन्मान मानला जातो. आतापर्यंत हिंदी, बंगाली आणि साऊथ इंडिया मधील 53 कलाकारांना या सन्मानाने सन्मानित केले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षापासून कोरोणामुळे हा पुरस्कार कोणालाही देण्यात आला नव्हता. मात्र या वर्षी या सन्मान सोहळ्याचे योजिले आहे. या सन्मानासाठी या वर्षी सिने तारीका आशा पारेख यांची निवड करण्यात आली आहे. या फेब्रुवारी मध्येच हा पुरस्कार जाहीर झाला होता, आणि आता 30 सप्टेंबर रोजी आशा पारेख यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

आशा पारेख यांच्या अभिनयाची सुरुवात

आशा पारेख यांनी पहिल्यांदा बालकलाकार म्हणून पडद्यावर आपली झलक दाखवली. 1952 मध्ये ‘ मा ‘ या चित्रपटात त्यांनी पाहिली भूमिका साकारली होती तेव्हा त्या अगदीच 10 वर्षाच्या होत्या.

बॉलिवूडची ‘ज्युबली गर्ल’

बॉक्स ऑफिसवर सतत चित्रपट देत असल्यामुळे आशा पारेख यांना ‘ज्युबली गर्ल’ म्हणून ओळखले जाऊन लागले. ‘जिद्दी’, ‘शिखर’, ‘आँ मिलो सजना’, ‘चिराग’ हे असे चित्रपट होते ज्यात आशा पारेख यांनी खूप प्रशंसा मिळवली. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पहिले फिल्मफेअर नामांकन मिळाले होते.

आशा पारेख यांना मिळालेले पुरस्कार 

भारतीय सिने सृष्टीत काम करणाऱ्या आशा पारेख यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 1971 मध्ये आलेल्या ‘कटी पतंग’ चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. ‘मैं तुलसी तेरे आंगन की’ आणि ‘उधार का सिंदूर’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. याचबरोबर त्यांना 1992 मध्ये पद्मश्री, 2006 मध्ये सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीसाठी आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी पुरस्कार, 2007 मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!