मुंबई : काल रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. 30 जून रोजी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला बोलावावे, असं पत्र फडणवीसांनी दिले आहे. फडणवीसांच्या पत्रानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं असं मानलं जात आहे.
यानंतर पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (गुरूवारी) पर्यंत राज्यपालांनी मुदत दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारसाठी गुरूवारचा दिवस निर्णायक ठरणार आहे. यानंतर आता शिवसेनेच्या दक्षिण भारतीय विभागाने देखील शिंदेंना पाठिंबा दिला आहे. दक्षिण भारतीय विभागाच्या कार्यकर्त्यांकडून शिंदे यांना थेट बाहुबलीची पदवी देण्यात आली आहे.
तसेच पुढे केवळ पदवीच देण्यात आली नाही तर तसे बॅनर देखील उभारण्यात आले आहेत. हे बॅनर शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरच लावण्यात आले आहेत. या बॅनरमध्ये एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे बाहुबली असल्याचे म्हटले आहे. शिंदे यांचे बाहुबली स्वरुपात उभारण्यात आलेले हे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. या बॅनरच्या माध्यमातून विजयी भवं असा संदेश देखील देण्यात आला आहे.
दरम्यान, यानंतर आज सकाळी एकनाथ शिंदे गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या मंदिरात दर्शनासाठी आले आहेत. यावेळी बहुमत चाचणीसाठी आपण उद्या मुंबईत जाणार असल्याची माहिती यावेळी एकनाथ शिंदेंनी दिली. एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह मुंबईत पोहोचणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :


