Share

Kishor Kadam : ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…’ , किशोर कदमांची ‘ती’ कविता चर्चेत

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळेच वळण लागल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे दोन गट झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. याचदरम्यान गुवाहाटीला गेलेले आमदार शहाजीबापू पाटील यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. आता यामध्येच अभिनेते-कवी किशोर कदम म्हणजेच सौमित्र यांनी कविता तयार केली आहे. सध्या ती कविता खूप चर्चेत आहे.

“काय झाडी…काय डोंगार…काय हाटील…एकदम ओके!’ शाहाजीबापू यांच्या या शब्दांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यावर किशोर कदम यांनी कविता तयार केली आहे. यांची कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

वाचा किशोर कदम यांची कविता – 

काय झाडी काय डोंगार काय हाटील
काय गावकरी काय सरपंच काय पाटील

काय समाज काय उमेदवार काय पक्ष
काय आमदार काय खासदार काय लक्ष

काय नेता काय जनता काय विश्वास
काय खरं काय खोटं काय आभास

काय श्रीमंत काय मध्यमवर्ग काय गरीब
काय सुदैव काय दुर्दैव काय नशीब

काय मतदार काय कॅांन्टीट्यूएंसी काय सत्ता
काय फायस्टार काय थ्री स्टार काय गुत्ता

काय भाषणं काय घोषणा काय नारे
काय मौसम काय वादळ काय वारे

काय विचार काय बांधिलकी काय तत्वं
काय पक्षनेता काय कार्यकर्ता काय स्वत्वं

काय बातम्या अन् अग्रलेख काय संपादक
काय ढोबळ वैचारिकन् काय आस्वादक

काय चॅनल काय मीडिया काय पेपर
काय शिणिमा काय ष्टोरी काय ठेटर

काय फेसबुक काय वॅाट्सप काय ट्विटर
काय ब्रिलियंट काय बकवास काय चीटर

काय युपी काय महाराष्ट्र काय बिहार
काय आर्थर काय येरवडा काय तिहार

काय सकाळ काय दुपार अन् संध्याकाळ
काय विमान काय पायलट काय आभाळ

काय झाडी काय डोंगार काय हाटील
काय गावकरी काय सरपंच काय पाटील

त्यांनी फेसबुकवरून ही कविता शेअर केली आहे. राजकीय परिस्थितीबाबत भाष्य करणाऱ्या कवितेला लोक चांगली पसंती देताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!