Share

MNS and BJP : मनसेच्या एकमेव आमदार बहुमत चाचणीत भाजपसोबत, राज ठाकरे-फडणवीसांची फोनवर चर्चा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत उद्या बहुमत चाचणी होणार आहे. बहुमत चाचणीनंतर सत्तेची चावी कोणाकडे राहणार हे स्पष्ट होईल. त्यासाठी भाजपने बहुमत मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. वृत्तानुसार, राज ठाकरे यांच्या पक्षाने भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नसून, राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या आधी सोमवारी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी राज्यातील ताज्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदारांच्या गटाने केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.

बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या आमदारांच्या गटाने आठवडाभरापूर्वी पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड केले होते. यानंतर या आमदारांना सुरतमधील एका हॉटेलमध्ये नेण्यात आले, तेथून आमदारांचा हा गट गुवाहाटीला गेला. सरुवातीला ११ आमदार शिंदे गटात होते. आता ३९ आमदार शिंदे गटात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच अडचणीत आले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!