Share

‘ईडीला पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं हे हास्यास्पद!, अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जवळजवळ २ आठवड्यांहून अधिक काळ ईडीला प्रतीक्षा करायला लावणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक दोन दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर झाले होते. सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळाल्यानंतर सरनाईक पिता-पुत्र ईडी कार्यालयात हजर झाले.

टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याबाबत 24 नोव्हेंबर रोजी ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. याप्रकरणी सरनाईक यांची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. आता, ईडीने मारलेल्या छापेमारीमुळे सरनाईकांची डोकेदुखी वाढणार असल्याच्या चर्चा सद्या होत आहेत.

सरनाईकांच्या घरी मारण्यात आलेल्या छापेमारीमध्ये पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचे वृत्त काही हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी दिलं. यानंतर, त्यांच्यावर भाजप नेत्यांनी गंभीर आरोप केले आहेत. मात्र, प्रताप सरनाईक यांनी हे आरोप फेटाळले असून असं खोटं वृत्त देणाऱ्यांवर न्यायालयीन कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.

‘ईडीने माझ्या घरी मारलेल्या छापेमारीत पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं असा खोटा दावा केला जात आहे. काही वृत्तवाहिन्या मुद्दामून असं वृत्त देत असून ते हास्यास्पद आहे. याआधीच मी ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं होतं मात्र पुन्हा नोटीस आल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. वकीलांशी या प्रकाराबाबत बोलणं झालं असून खोटे वृत्त देणाऱ्यांविरोधात न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

आता फक्त ईडीने फोन केला तरी मी हजर होईन, समन्सची गरज नाही! – सरनाईक

दोन दिवसांपूर्वी सरनाईक ईडीच्या चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित झाले होते. यानंतर त्यांनी बाहेर येताच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ईडीने कौटुंबिक, व्यवसायातील प्रश्न केले असता आपण सर्व उत्तर दिली असून ईडीचे समाधान झाले की नाही याची कल्पना आपल्याला नाही. मात्र, जर चौकशीसाठी पुन्हा बोलवायचंच असेल तर फक्त फोन केला तरी हजर राहीन, त्यासाठी समन्स देण्याची गरज नाही असं विधान करतानाच त्यांनी ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं विधान त्यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!