मुंबई : आज १२ डिसेंबर माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. आज शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, देशाचं संरक्षणमंत्री पद, कृषीमंत्रीपद अशी अनेक महत्त्वाची पदं सांभाळली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अनेक नेत्यांनी पवारांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पवारांचा वाढदिवस यंदा कोरोनाच भान राखून समाज उपयोगी कामांद्वारे साजरा केला जात आहे. राष्ट्रवादीतर्फे आज मुंबईत छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यातील राष्ट्रवादीचे नेते हे व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहिले होते, तर निवडक नेते हे प्रत्यक्ष स्थळी उपस्थित होते.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील २९ लाखापेक्षा जास्त असलेल्या दिव्यांग व्यक्तींना एक अनोखी भेट दिली आहे.दिव्यांग कल्याण आयुक्तालयमार्फत दिव्यांग व्यक्तींना विविध सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाशरद’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म ‘ओएलएक्स’ अॅपच्या धर्तीवर तयार करण्यात आला असून आजपासून हे सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे बीड येथून व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहिले होते. कोणतेही संकट असो, कोणावरही संकट असो त्या संकटात मदतीला हमखास धाऊन जाणारा माणुस म्हणजे शरद पवार. आजही संकटात शेतक-यांना शरद पवारांत देवमाणुस दिसतो,’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडीला पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं हे हास्यास्पद!, अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार’
- शेतकरी आंदोलनाबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेला मारले जोडे
- ‘पवार म्हणजे महाराष्ट्राला वैचारिकदृष्ट्या ८०० वर्ष पुढे घेऊन गेलेलं महायुग’
- ‘कोरोनोत्तर काळात राज्यात पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना देणार’
- ‘ठाकरे सरकार आल्या आल्या नाईट क्लबवाले त्यांच्या बापाचं सरकार असल्यासारखे वागू लागलेत’


