Share

पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या ठाकरेंनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पटकावला पहिला क्रमांक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कमाल केली आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरेंनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव पटकावलं आहे. प्रश्नम या संस्थेने महाराष्ट्र, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या 13 राज्यांतील जनतेचा कौल जाणून घेतला होता. सुमारे 17,500 मतदारांनी सहभाग नोंदवलेल्या या सर्वेक्षणात सर्वाधिक मतदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पसंती दर्शवली आहे. कोरोना काळात केलेल्या कामावरून जनतेने हा कौल दिला आहे.

पहिल्या फेरीत त्यांनी 13 राज्यांची निवड केली. या राज्यांमध्ये भारतातील 67 टक्के लोकसंख्या आहे. सर्वेक्षणानुसार असं समोर आलं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सर्वेक्षणात जवळपास 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

ठाकरे यांच्या नंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना 44 टक्के पसंती मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत. राज्यातील सर्वेक्षण झालेल्या 40 टक्के मतदारांनी त्यांच्या कामगिरीला मान्यता दिली. तुम्हाला तुमच्या मुख्यमंत्र्यांचं काम कसं वाटतं? त्यांच्या कामाची पद्धत वाढवते का? असा प्रकाराचे प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांपुढे 4 ऑप्शन देण्यात आले होते. त्यानुसार मतदारांना त्याची निवड करायची होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!