Shivsena । शिर्डी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ५० आमदार घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले. आमदारानंतर आता १२ खासदारांनी देखील एकनाथ शिंदे यांना समर्थन दर्शवल आहे. तर दुसरीकडे विस्कळीत झालेल्या शिवसेना पक्षाची पुन्हा मोट बांधण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभर निष्ठा यात्रा काढण्यास सुरवात केली आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या निशाण्यावर शिंदे गटातील बंडखोर आमदार आहेत. तसेच त्यांच्या शिर्डी दौऱ्यादरम्यान एका शिवसैनिकांचा आश्चर्य चकित करणारा व्हिडीओ समोर आला आहे.
आदित्य ठाकरेंच्या शिर्डी दौऱ्यावर असताना शिवसेनेच्या एका मुस्लीम मावळ्यानं स्वतःच्या रक्तानं आदित्य ठाकरेंना पत्र लिहिलं. शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचं त्यानं पत्रात म्हटलंय. हे पत्र त्यानं आदित्य ठाकरेंना दिलंय. त्यानं लिहिलेल्या या पत्राचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात नेवासा आणि नंतर शिर्डीत कार्यकर्तांशी संवाद साधत या दौऱ्याची साईदर्शनानं सांगता झाली. मात्र, यादरम्यान मुस्लीम कार्यकर्त्यानं उचललेल्या या पाऊलामुळे लोक भावुक झालेत.
दरम्यान, असाच काहीसा आणखीन एक प्रकार औरंगाबादच्या गंगापूर गावात घडलाय. औरंगाबादच्या गंगापूर गावात आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा जेव्हा पोहोचली. त्यावेळी आदित्य ठाकरेंचं भाषण सुरु असताना एका आजोबांना रडू कोसळलं. दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut : शिंदे-फडणवीस सरकार अंतर्गत मतभेदांमुळे कोसळणार, संजय राऊतांची भविष्यवाणी!
- Neeraj Chopra : नीरज चोप्राने पुन्हा एकदा रचला इतिहास; जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदक!
- Shiv Sena : सुरत, गुवाहाटी आणि गोव्याला गेल्यामुळे गुलाबराव पाटलांना स्मृतिभ्रंश झालाय; शिवसेनेचा पलटवार
- Raj Thackeray : शिंदे गटाने मनसे पक्षात विलीन व्हायचा प्रस्ताव दिला तर आम्ही विचार करु – राज ठाकरे
- Raj Thackeray : पवारांनी सांगितलं म्हणून मी माझा पक्ष काढेल का? राज ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

