मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ या अत्यंत आक्रमकपाने महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत आहेत. त्यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्या चौकशीची मागणी लावून धरलेली आहे.संजय राठोड यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले असताना आता चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत बोलत एका वृत्त वाहिनीशी बोलत होते. ते म्हणाले कि, राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत, ते ‘मिस्टर सत्यवादी’ आहेत. त्यामुळे पूजा चव्हाणला न्याय मिळणारच असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय.
संजय राऊत म्हणाले की, “पूजा चव्हाण प्रकरणी तपास सुरु आहे. मुख्यमंत्री हे अत्यंत संवेदनशील मनाचे आहेत. ते काही डोळे झाकून बसले नाहीत. मुख्यमंत्री हे कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत. त्यांचे राज्यातील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असते. या प्रकरणाचा तपास होणार आणि पूजा चव्हाण आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळणार.”
चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्ल असतं असं वक्तव्य केलं आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “चित्रा वाघ या विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे त्या आंदोलन करत आहेत. त्यांच्याकडे या प्रकरणाची अतिरिक्त माहिती असेल तर त्यांनी ती राज्याचे गृहमंत्री आणि तपास यंत्रणाना द्यावी.”
पूजा चव्हाण आत्महत्येशी संबंधित संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्वावर अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालंय. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने मुलुंड टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बंगाल को अपनी बेटी चाहिए, बुआ नहीं’ भाजपकडून तृणमूलला जोरदार प्रत्युत्तर
- सावधान! ‘या’ रुग्णांची माहिती लपवल्यास होणार २ वर्षांचा कारावास
- याजसाठी केला होता अट्टाहास, पण शेवट वाईट झाला! चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश निष्फळ?
- खाम स्वच्छता मोहीम,नव्या ‘स्मार्ट’ सीईओंची अनुपस्थिती
- जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
