नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे.
सद्या, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे (TMC) सरकार आहे. आता, बंगालच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. पश्चिम बंगलामध्ये एकूण आठ टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिला टप्पा २७ मार्च रोजी पार पडेल. तर आठ टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर २ मे रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचा चेहरा कोण असणार, याची घोषणा करा असं टीएमसीकडून वारंवार म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर टीएमसीनं भाजपवर टीका करत ‘बंगाल को अपनी बेटी चाहिए’ असंही म्हटलं आहे.
বাংলা তার মেয়েকেই চায়, পিসিকে নয়! pic.twitter.com/rDFYzgLZTK
— BJP West Bengal (@BJP4Bengal) February 27, 2021
यावरून आता भाजपनं या वाक्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपनं बंगाल भाजपमधील नऊ महिला नेत्यांचे फोटो ट्वीटरवरुन शेअर केले आहेत. सोबतच बंगालला आपली मुलगी हवी आहे, आत्या नाही, अशा शब्दात ममता बॅनर्जींना प्रत्युत्तरही दिलं आहे. भाजपनं पोस्टरमध्ये ममता यांना आत्या म्हटलं आहे. टीएमसीनं बंगाल निवडणुकीच्या अभियानाच्या सुरुवातीलाच बंगालला आपली मुलगी हवी असल्याची घोषणा दिली होती.
One of the key battles FOR DEMOCRACY in India will be fought in West Bengal, and the people of Bengal are ready with their MESSAGE and determined to show the RIGHT CARD – #BanglaNijerMeyekeiChay
(Bengal Only Wants its Own Daughter)
PS: On 2nd May, hold me to my last tweet. pic.twitter.com/vruk6jVP0X
— Prashant Kishor (@PrashantKishor) February 27, 2021
दरम्यान, रणनितीकार प्रशांत किशोर यांनी ट्विट केले आहे. किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की पश्चिम बंगालची ही निवडणूक म्हणजे देशातील लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. पश्चिम बंगालची जनता त्यांचे उत्तर देण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच बंगालला त्यांची स्वतःची कन्या हवी आहे दोन मे रोजी माझे हे ट्विट पुन्हा पाहा असेही किशोर यांनी नमूद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दारू विकणाऱ्यानेच दिली दारू विक्रीची तक्रार, मग काय? खाल्ला मार!
- सावधान! ‘या’ रुग्णांची माहिती लपवल्यास होणार २ वर्षांचा कारावास
- याजसाठी केला होता अट्टाहास, पण शेवट वाईट झाला! चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश निष्फळ?
- खाम स्वच्छता मोहीम,नव्या ‘स्मार्ट’ सीईओंची अनुपस्थिती
- जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नोंद

