रत्नागिरी: जागतिक महिला दिनानिमित्त योगगुरू रामदेव बाबा योग शिबिरासाठी रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी ऐतिहासिक पतितपावन मंदिर या ठिकाणी असलेल्या वीर सावरकर स्मारक आणि लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाला भेट दिली. त्यानंतर रामदेव बाबांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारतातील नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांबद्दल पत्रकार परिषदेत रामदेव बाबा म्हणाले कि, जे होईल ते मतदारांच्या मनाप्रमाणे होईल. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळेल असं एक्सिट पोलमधून समोर येत आहे. काही लोकांना वाटलं होतं कि आता भाजप रसातळाला जाईल पण तसं काहीही होणार नाही. सोशल मिडियावर तसं चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र तसं होणार नाही. भाजपला वर्चस्व प्राप्त होईल. त्याचबरोबर केजरीवाल सुद्धा चांगली कामगीरी करतील.
काँग्रेसमध्ये राज्य स्तरावर नेतृत्वाचा अभाव हि त्यांच्यासाठी मोठी समस्या आहे. राष्ट्रीय स्तरावर आणखी नेतृत्वात प्रबळ झालं तर काॅग्रेस अधिक बळकट होईल. या निवडणुकांनंतर सर्वांना आत्मपरिक्षण करण्याची संधी मिळेल, असंही योगगुरु रामदेव बाबा म्हणाले. तर बाकी यावर माझ्यासारखा फकीर काय बोलणार, असं म्हणत निवडणूक निकालावर अधिक बोलणं रामदेव बाबा यांनी टाळले. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे चांगल काम करत आहेत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांचं कौतुक देखील रामदेव बाबा यांनी केले. दरम्यानं महाराष्ट्रात सुरु असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या धाडसत्रावर बोलताना “दोन वजीर” लढत आहेत, असं विधान रामदेव बाबानी केले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारत रत्न असून त्यांना भारतरत्न मिळायला हवे आणि आज ना उद्या याची घोषणा नक्की होईल, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

