पुणे : गेल्या वर्षी अभिनेत्या उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस पक्षातून राजकीय वाटचाल सुरु केल्यानंतर त्यांनी काही महिन्यांतच काँग्रेसला रामराम ठोकला होता. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मातोंडकर यांची राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी केल्याचं समोर आलं होतं. अद्याप राज्यपाल नियुक्त आमदारांचे प्रकरण प्रलंबित आहे.
दरम्यान, शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या उर्मिला मातोंडकर या आता शिवसंपर्क अभियानाच्या कारणाने सक्रिय झाल्या असून आज पुण्यातील अभियानामध्ये त्या सामील झाल्या होत्या. आजपासून (१२ जुलै) सुरु झालेलं शिवसंपर्क अभियान हे २४ जुलैपर्यंत राज्यभरात राबवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधून राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. कोरोना काळातील कामासाठी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक देखील केलंय. ‘महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीने जितकं उत्तम काम कोरोनाच्या काळात केलं असतं त्यापेक्षा जास्त उत्तम काम उद्धव ठाकरे यांनी केलंय आणि घराघरांतून त्यांना तशी पावती ही मिळाली. त्यांनी योग्य नियोजन केल्यामुळे कोरोनाची परिस्थितीत नियंत्रणात मिळवता आली आहे,’ असं त्या म्हणाल्या.
‘मुख्यमंत्र्यांनी पदभार घेतल्यापासून अत्यंत कठीण काळाचा सामना त्यांना करावा लागला आणि त्यांनी धीरोदत्त राहून केला. श्रेय देऊ द्यात किंवा नको देऊ द्यात पण देशात सर्वात उत्तम काम त्यांनी केलं. त्यांच्यावर अनेकांनी केली. पण त्यांना उत्तर देण्यात वेळ न घालवता विकासावर लक्ष केंद्रीत केलंय. ओरडणारे ओरडतच राहतील,’ असा टोला देखील उर्मिला मातोंडकर यांनी विरोधकांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना म्हणजे थोतांड; वारकऱ्यांनो रस्त्यावर उतरा, मंदिरांची कुलुपे तोडा – संभाजी भिडे
- कोरोनामुळे बॉलीवूडला आर्थिक झळ! तरीही या अभिनेत्याने खरेदी केली कोट्यावधी रुपयांची कार
- संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार ? ; उर्मिला मातोंडकर म्हणाल्या…
- सावळ्या रंगामुळे सोनालीला देखील करावा लागला वर्णभेदाचा सामना; अनुभव शेअर करत म्हणाली …
- लोकसंख्येचा विस्फोट होत असेल तर कायदा गरजेचाच – देवेंद्र फडणवीस


