Share

कोरोना म्हणजे थोतांड; वारकऱ्यांनो रस्त्यावर उतरा, मंदिरांची कुलुपे तोडा – संभाजी भिडे

Published On: 

सांगली : सध्या देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा कायम आहे. त्यामुळे आषाढी वारीदेखील कोरोना सावटात पार पडणार आहे. पायी वारी सोहळ्यासाठी वारकरी आग्रही आहेत. परंतु सरकारनं आषाढी वारीसाठी मोजक्याच आणि मानाच्याच पालख्यांना परवानगी दिली आहे. अशातच आता पायी वारी सोहळ्याच्या परवानगी द्यावी अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी देखील केली होती.

‘पंढरीची वारी झाल्यावर देशातील नव्हतेतर जगातील कोरोना आटोक्यात नाहीतर नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी काही विघ्नं नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारी करण्यास परवानगी द्यावी’ असं विधान काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यांची अनेक विधाने हे वादग्रस्त असून त्यांच्यावर सातत्याने टीकास्त्र देखील सोडण्यात येते.

आता संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळली आहेत. ‘कोरोना म्हणजे थोतांड आहे. सरकार हे थोतांड का वाढवत आहे कळत नाही, मात्र हे सर्व देशात चाललेले षडयंत्र आहे. वारकरी रस्त्यावर उतरले पाहिजेत, मंदिराची कुलुपे तोडायला हवीत,’ असं विधान भिडे यांनी केलं आहे.

यासोबतच त्यांनी पुढाऱ्यांना देखील सुनावलं आहे. ‘महाराष्ट्रात आज भगवंतांचे नामकरण करत वारीला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. कारण काय तर वारीमुळे कोरोन वाढू शकतो. मात्र कोरोना म्हणजे थोतांड आहे. निव्वळ थोतांड आहे, कोरोना वगैरे काही नाही, लॉकडाऊनमुळे जेवढं वाटोळं झालंय. सरकारचा अत्यंत चुकीचा निर्णय, पुढारी लोक काय लायकीचे आहेत ते माहिती आहे. एकजात सर्वजण स्वार्थी आहेत,’ अशी चपराक भिडे यांनी लगावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!