मुंबई : कोरोना विषाणूचा वाढत्या परिणामामुळे अनेकांवर याचा परिणाम झाला आहे. लॉकडाऊन, त्यामुळे आलेली बेरोजगारी याचाही समाजव्यवस्थेवरही वाईट परिणाम झालेला आहे. कोरोनामुळे बॉलीवूडचे देखील बरेच नुकसान झाले. मागिल दोन वर्षांपासून चित्रपटगृह बंद असल्यामुळे कोणताही सिनेमा चित्रपट गृहात प्रदर्शित करता आला नाही. तसेच चित्रीकरणही थांबवले.
त्यामुळे काही कलाकारांना मदत मागण्याची देखील वेळ आली. अशातच बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना याने एक लग्जरी कार खरेदी केली आहे. या एसयूवीच्या एक्स-शोरूमची किंमत जवळ-जवळ 2.43 कोटी रुपये आहे.
https://www.instagram.com/p/CREMQbTAFWs/?utm_source=ig_web_copy_link
मागील काही महिन्यांपासून देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. तरीही देशावरील कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाही. देशात तिसरी लाट येऊ नये म्हणून प्रशासन वेळोवेळी कडक निर्बंध लावत आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्र पूर्णपणे खुलं करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. याचा फटका अनेकांना सहन करावा लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मंत्रिपदाची नाराजी! ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन भाजप जिल्हाध्यक्ष पंकजा मुंडेंच्या भेटीला
- नितेश राणेंनी एकत्र येण्याचे वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेने दिली प्रतिक्रिया
- वेब सिरीजनंतर क्रीडाविश्वात ‘समांतर’ची पुनरावृत्ती! सचिन-मेसीची सारखीच कहाणी
- ‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, कारण…’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भूमिका
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त


