🕒 1 min read
नागपूर – उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत लोकसंख्या धोरण जाहीर केले. यामध्ये परिवार नियोजन करण्यासह अनेक योजना राबाविण्याचा विचार सुरू असून एक मुल झाल्यानंतर नसबंदी केल्यास त्यांना 20 वर्षापर्यंत मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण, विमा, यासोबत शासकीय नोकरित प्राधान्य असे अनेक लाभ या लोकसंख्या धोरणाच्या माध्यमातून देणार असल्याचे या धोरणात म्हटले आहे.
योगींनी घेतलेल्या या निर्णयावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे अशा राज्यांमध्ये लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी कायदा करणं आवश्यक असून गरज असल्यास देशातही अशा प्रकारचा कायदा लागू झाला पाहिजे असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
नागपुरात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त काल ते बोलत होते. आपल्या देशातील लोकशाहीच्या आधारावर नागरिकांना काही सवलती देऊन अशा कायदयाची अंमलबजावणी केली पाहिजे असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. लोकसंख्या नियंत्रणात असणे गरजेचे आहे. आपण लोकशाही देशात राहतो. देशातील लोकसंख्या वाढीला रोखण्यासाठी प्रोत्साहन म्हणून कायदा लागू केल्यास नक्कीच याचा फायदा होईल असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- वेब सिरीजनंतर क्रीडाविश्वात ‘समांतर’ची पुनरावृत्ती! सचिन-मेसीची सारखीच कहाणी
- ‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, कारण…’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भूमिका
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- ‘…तर खांद्याला खांदा लावून काम करु’; नितेश राणेंच्या भाषणानंतर शिवसेना नेत्याने थोपटली पाठ


