Share

संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार ? ; उर्मिला मातोंडकर म्हणाल्या…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने पुण्यातील वानवडी परिसरातील एका इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. यानंतर या आत्महत्या प्रकरणामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील महिलावर्ग नाराज झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते.

पुढे काही फोटो व कथित ऑडिओ रेकॉर्ड्स समोर आले होते. यातील काही क्लिप्समध्ये पूजाशी संजय राठोड यांचे संभाषण झाल्याचा आरोप भाजपने केला होता. संजय राठोड यांच्या विरोधात भाजपने आक्रमक पवित्र घेत त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेऊन रितसर चौकशी करावी अशी मागणी केली होती. वाढत्या तणावानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्या वनमंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता. मात्र आता पुन्हा हेच संजय राठोड हे मंत्रिमंडळात असायला हवे असे सेनेच्या मंत्र्यांना वाटू लागले आहे.

‘संजय राठोड यांच्या कामाची पद्धत पाहता त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, लवकरच ते मंत्रिमंडळात सामील होतील,’ असं सूचक विधान सेनेचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत केले होते. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळाची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगू लागली आहे

यावर आता शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी देखील भास्य केले आहे. त्या आज पुण्यामध्ये शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेसाठी आलेल्या होत्या. यावेळी त्या बोलताना म्हणाल्या कि, ‘राठोड मंत्रिमंडळात येणार का? या चर्चा केवळ प्रसारमाध्यमात आहेत. तुम्ही लोकं यावर चर्चा करत आहात, अशी प्रतिक्रिया त्यांनी केली. यावेळी त्यांनी विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीवर बोलण्यास नकार दिला. मला यावर बोलायचं नाही, असं त्या म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!