Share

सावळ्या रंगामुळे सोनालीला देखील करावा लागला वर्णभेदाचा सामना; अनुभव शेअर करत म्हणाली …

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अभिनयाची जादू केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटामध्ये देखील दाखवली. तिच्या अभिनयाने अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. मात्र प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला देखील कधी काळी वर्णभेदाचा सामना करावा लागला आहे. याबाबतचा एक अनुभव तिने शेअर केला आहे.

एका मुलाखतीत हा मोठा खुलासा करत सोनाली म्हणाली, बॉलिवूडमध्ये मला कधीच वर्णभेदाचा सामना करावा लागला नाही. पण पुण्यात मात्र या गोष्टी मी सहन केल्या आहेत. बॉलिवूडनं मला स्वीकारलं, मला बॉलिवूडमध्ये रंग भेदाचा सामना करावा लागला नाही. मात्र पुण्यात पहिल्यांदा आॅडिशनसाठी गेले होते, एका बाईनं मला नको ते ऐकवलं होतं. तेव्हा मी गिरीश कर्नाड यांना भेटायला गेले होते. तेव्हा तिथे आणखी एक मुलगी तिच्या आईसोबत आली होती. त्या मुलीच्या आईनं मला बघितलं आणि तू इथे का आली आहेस? असा प्रश्न मला केला.

https://www.instagram.com/p/CP5vmbdBSwM/?utm_source=ig_web_copy_link

पुढे त्या म्हणाल्या की, मी अगदी निष्पापणे गिरीश कर्नाड यांना भेटायला आल्याचं तिला सांगितलं. कारण तोपर्यंत तो प्रश्न विचारण्यामागचा त्या बाईचा उद्देश माझ्या ध्यानात आला नव्हता. पण त्या बाई बोलायच्या थांबल्या नाहीत. तू आरशात कधी तुझा चेहरा पाहिला आहेस? काळ्या मुली कॅमेऱ्यात चांगल्या दिसत नाही, असं ती बाई मला थेट म्हणाली. त्या बाईच्या त्या शब्दांनी मी लाजीरवाणी झाले होते. 15-20 मिनिटांनंतर मी गिरीश कर्नाड यांना भेटली. त्यांनी माझ्याशी भरभरून गप्पा मारल्या. माझं कौतुक केलं. त्यांच्या त्या कौतुकानंतर बाहेरची ती बाई काय म्हणाली, त्याचं काही महत्त्व उरलं नव्हतं. अर्थात तसंही मी ते फार गंभीरपणे ही घेतलं नसते, असा एक अनुभव सोनालीने शेअर केले आहे.

https://www.instagram.com/p/CPLSCUFhrX2/?utm_source=ig_web_copy_link

सोनलीनं केवळ मराठी आणि हिंदी चित्रपटातच काम केले नाही तर, तिने तर गुजराती, कन्नड, तामिळ, इटालियन आणि इंग्रजी सिनेमांत काम केलं आहे. तिने तिच्या अभिनयाच्या कौशल्याने सिनेइंडस्ट्रीत स्वत:ची अशी खास ओळख निर्माण केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!