औरंगाबाद : सध्याच्या घडीला राज्यातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. याला अनुसरून राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार १५ ऑगस्ट पासून हॉटेल, दुकाने, रेस्टॉरंट्स इत्यादींचे निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. परंतु असे असले तरी देखील अजूनही सर्व मंदिरे आणि धार्मिक ठिकाण बंदच ठेवण्यात आली आहेत. यामुळे भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून पुन्हा एकदा नाराजीचे सूर ऐकू येत असून भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात तुषार यांनी घोषणा केली आहे की, ‘१२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या औरंगाबादेतील घृष्णेश्वर मंदिरासमोर भाजपची अध्यात्मिक आघाडी आंदोलन करणार आहे. तुषार भोसले यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे भाविकांसाठी श्रावणातील सोमवार हा महत्वाचा दिवस असतो. त्यामुळे श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी हे आंदोलन केले जाणार आहे.
‘मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो. मात्र, आता सर्व काही सुरु झालेले असून शासनाने नियमांमध्ये शिथीलता दिलेली असताना मंदिरे उघडण्याचा निर्णय देखील सरकारकडून घेण्यात यावा’ असे देखील ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘डरायचं नाही तर फक्त लढायचं!’, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निर्धार
- ‘डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या सूत्रधारांचे काय झाले?’, अंनिसचा सरकारला सवाल
- आश्चर्यम! राऊतांकडून राज्यपालांचे कौतूक; म्हणाले, ‘ते प्रेमळ, सद्वर्तनी, मनमिळावू, पण..’
- भाजपाचे चाणक्य लागले कामाला, एका बाणातून साधणार दोन निशाणे
- बंदी असतानाही गोपीचंद पडळकरांकडून २० ऑगस्टला बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

