🕒 1 min read
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी ठाणे व पालघरमधील आमदारांची बैठक झाली. तसेच आज मुंबईतल्या ‘सह्याद्री’ या अतिथीगृहावर शिवसेना आमदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या सूचना ऐकून घेतल्या.
मुंबईतील काही आमदारांनी रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांपासून पोलीस वसाहती, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर सूचना केल्या आणि धोरणात्मक विषय मांडले.
तसेच उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.उद्धव ठाकरे म्हणाले की ‘मुंबईत कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे दुसरी लाट येणार नाही यासाठी सतर्क रहा.स्वतः देखील स्वताची काळजी घ्या.
भांडुप, कांजूर आणि मुलुंड येथील खोतीच्या जमिनीचा प्रश्न आमदार सुनील राऊत यांनी मांडला. मोहम्मद युसूफ खोत आणि रतनसी करसनदास यांचे या भागात भूखंड असून खोतीची ही जमीन राज्य सरकारने ताब्यात घ्यावी आणि विकासासाठी ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
सुनील प्रभू म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांच्या मतदारसंघातील प्रश्न ऐकून घेतले. मुंबईतील म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास, महापालिकेच्या प्रकल्पातील विस्थापितांना त्याच भागात घरे देण्याच्या संदर्भातील हे सर्व धोरणात्मक विषय आहेत.
संबंधित अधिकाऱ्य़ांनी याबाबतीतचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. काही प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या विषयांवर अधिकाऱ्य़ांसोबत स्वतंत्र बैठका घेण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- भाजप नेते त्यांच्या कार्यकर्त्याविरोधात कारवाई झाल्यासारखे ओरडत आहेत – अनिल परब
- सराफाकडून १ लाखाची लाच घेताना संगमनेरच्या पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले!
- अर्नब गोस्वामीच्या समर्थनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात…
- महाराष्ट्र पोलीस आमच्यासाठी उभी राहिली; अर्णबच्या अटकेनंतर अन्वय नाईकच्या पत्नीने मानले आभार!
- ‘उसूलों पे चला होगा !’, अर्णबच्या अटकेनंतर अमृता फडणवीसांचा शायरी स्टाईल टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
