Share

महाराष्ट्र पोलीस आमच्यासाठी उभी राहिली; अर्णबच्या अटकेनंतर अन्वय नाईकच्या पत्नीने मानले आभार!

Published On: 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.

आता याचप्रकरणी अर्णब गोस्वामी याला अटक करण्यात आल्यानंतर अन्वय नाईकला तब्बल अडीच वर्षानंतर तरी न्याय मिळणार का? असा सवाल निर्माण होत आहे. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आपण हे पाऊल उचलत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी मृत्युपुर्वीच्या पत्रातून केला होता.

या घटनांतर अन्वय नाईक यांच्या पत्नीने व मुलीने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले आहेत. “अर्णब गोस्वामीने वडिलांच्या शेवटच्या प्रोजेक्टमध्ये कोट्यवधी रुपये अडकवून ठेवले. त्यामुळं अनेकांचे देणी रखडले. यासोबतच आम्हाला घाबरवण्यात आलं. दम देण्यात आला. मात्र, आज संकष्टीच्या दिवशी बाप्पाच्या कृपेने महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे हा दिवस बघता आला.” अशी भावना व्यक्त केली.

“महाराष्ट्र पोलीस मराठी पत्नीच्या, मुलीच्या एवढंच नाही तर पत्नीच्या पाठीशी उभं राहून मोठी भूमिका बजावली आहे. अर्णब गोस्वामीसह फिरोज शेख आणि नितीश साढा या उद्योगपतींमुळे अन्वय नाईक यांना टोकाचं पाऊल उचलावं लागलं असून तेच जबाबदार आहेत.” असा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!