Share

सराफाकडून १ लाखाची लाच घेताना संगमनेरच्या पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अवघ्या एक वर्षापूर्वी बदलून आलेले पोलिस उपनिरीक्षक राणा प्रतापसिंग परदेशी यांना काल नाशिक येथील सोनाराकडून अटक न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्विकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पोलिस विभाग विविध कारणास्तव रडारवर येत असतानाच त्यात काल संगमनेरातही भर पडली आहे. या घटनेने संगमनेर पोलिसांची अब्रु मात्र वेशीला टांगली गेली आहे.

मालदाड रोड परिसरातील स्वतःच्या घरातून त्यांच्या मुलाने मित्राच्या मदतीने सुमारे सव्वातीन लाख रुपयांची चोरी केली होती. यातील दागिने त्याने वडील आजारी असून, पैशांची गरज असल्याचे सांगत नाशिक येथील सोनाराला विकले होते. अवघ्या चार दिवसांपूर्वी यातील आरोपींना राणा परदेशी यांनी गोव्यातून अटक केली होती.

या प्रकरणातील चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफाला गुन्ह्यात अटक न करण्यासाठी परदेशी यांनी त्या सोनाराकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती एक लाख रुपये काल देण्याचे ठरले होते. मात्र हुशार सोनाराने थेट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

त्यानुसार पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे, उपाधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली, लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शहर पोलिस ठाण्याजवळ सापळा रचला होता. लाचेची रक्कम खासगी व्यक्तीमार्फत स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.

यावेळी परदेशी त्यांनी पोलिस ठाण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र क्रीडा संकुलाजवळ त्यांना पकडण्यात आले. परदेशी यांची यापूर्वीच वसई पोलिस ठाण्यात बदली झाली आहे, मात्र त्यांनी अद्याप येथील पदभार सोडला नव्हता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!