Share

भाजप नेते त्यांच्या कार्यकर्त्याविरोधात कारवाई झाल्यासारखे ओरडत आहेत – अनिल परब

Published On: 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण महाराष्ट्र सरकारवर सतत निशाणा साधल्यानंतर रिपब्लिक टीव्हीसह अन्य काही वाहिन्यांचा टीआरपी स्कॅमसमोर आला आणि अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली.

आता आणखी एका प्रकरणावरून आज त्यांना अचानक अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.

यावरून आता राजकारण पेटलं असून भाजप नेते महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. अर्नबवर केलेली कारवाई म्हणजे सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. असे आरोप विरोधी पक्ष करत असतना शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. अर्णब गोस्वामींवरील कारवाई ही वृत्तपत्र स्वातंत्र्याविरोधातील कारवाई नाही. त्यांनी एका व्यवसायिकेचे पैसे बुडवल्यानं कारवाई होतेय. भाजप नेते त्यांच्या कार्यकर्त्याविरोधात कारवाई झाल्यासारखे ओरडताहेत अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.

तर देशाचे गृहमंत्री अमित शहा हे अर्नब गोस्वामीच्या बचावात उतरले आहे. अमित शाहांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसप्रणित आघाडीकडून महाराष्ट्रात लोकशाहीची गळचेपी सुरू आहे, पुन्हा एकदा त्यांनी लाज आणल्याची घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.

रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्य सत्तेचा स्पष्टपणे गैरवापर करत आहे. तसेच हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. या कृत्यानं पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण करून दिली आहे. मुक्त प्रेसवरील हल्ला असून त्याचा प्रतिकार केला जाईल, असंही अमित शाहा यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!