मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण महाराष्ट्र सरकारवर सतत निशाणा साधल्यानंतर रिपब्लिक टीव्हीसह अन्य काही वाहिन्यांचा टीआरपी स्कॅमसमोर आला आणि अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली.
आता आणखी एका प्रकरणावरून आज त्यांना अचानक अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.
यावरून आता राजकारण पेटलं असून भाजप नेते देशाचे गृहमंत्री अमित शहा हे अर्नब गोस्वामीच्या बचावात उतरले आहे. अमित शाहांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसप्रणित आघाडीकडून महाराष्ट्रात लोकशाहीची गळचेपी सुरू आहे, पुन्हा एकदा त्यांनी लाज आणल्याची घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.
Congress and its allies have shamed democracy once again.
Blatant misuse of state power against Republic TV & Arnab Goswami is an attack on individual freedom and the 4th pillar of democracy.
It reminds us of the Emergency. This attack on free press must be and WILL BE OPPOSED.
— Amit Shah (@AmitShah) November 4, 2020
रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्य सत्तेचा स्पष्टपणे गैरवापर करत आहे. तसेच हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. या कृत्यानं पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण करून दिली आहे. मुक्त प्रेसवरील हल्ला असून त्याचा प्रतिकार केला जाईल, असंही अमित शाहा यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मनसेच्या पदाधिकाऱ्यांमुळे आमदार निलेश लंके यांच्या हातून होणारी मोठी चूक टळली!
- ‘उसूलों पे चला होगा !’, अर्णबच्या अटकेनंतर अमृता फडणवीसांचा शायरी स्टाईल टोला
- महाविकास आघाडी सरकार डिसेंबरपर्यंतच सत्तेत राहणार; भाजपच्या माजी मंत्र्याचे भाकित!
- कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करणारच – अनिल देशमुख
- सुळे ताई याला आणीबाणी म्हणतात, अर्नबच्या अटकेवरून निलेश राणेंचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

