Share

‘उसूलों पे चला होगा !’, अर्णबच्या अटकेनंतर अमृता फडणवीसांचा शायरी स्टाईल टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.

दुसरीकडे, महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये टीकेचं युद्ध सुरु झालं आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात आवाज उठवल्यामुळे गोस्वामीवर ही कारवाई सूडबुद्धीने केली गेल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे. आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील या प्रकरणावर एक शायरी स्टाईल ट्विट करून भाष्य केलं आहे.

अमृता फडणवीस यांनी याआधी देखील सुशांतसिंह राजपूत मृत्यप्रकारणासह अभिनेत्री कंगना रानौतवरील कारवाईवरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं होतं. आता अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर ‘बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा !’ अशी शायरी ट्विट करून अर्णबचं समर्थन करतानाच महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!