नागपूर : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. परंतु रविवारी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तिनं आपली जीवनज्योत विझवली. ही आत्महत्या आहे की तिला कोणी मारलं ? असा प्रश्न भाजपा महिला आघाडीने उपस्थित करून या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं आहे. या २२ वर्षीय तरूणीचे ठाकरे सरकारमधील कथित मंत्र्यांसोबत प्रेमसंबंध होते, त्यातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व घटनाक्रमावर भाष्य केले आहे. ‘या प्रकरणी व्यवस्थित चौकशी केली जाईल आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल. त्यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल, त्यांच्यावर कारवाई होईल’, असं त्यांनी सांगितलं आहे. ‘गेले काही दिवस काही महिने काही वेळेला आपलं असं लक्षात आलेलं आहे. आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा केला जातोय. तर असाही प्रयत्न होता कामा नये व याचबरोबर सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामा नये. सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही. जे काही सत्य असेल ते पूर्ण चौकशीतून जनतेसमोर येईल’, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचा आहे, हे स्पष्ट आहे. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंना या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही’, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी या संबंधातील नीट माहिती घ्यावी म्हणजे कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय ते त्यांना कळेल, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राठोड हे विदर्भातील शिवसेनेचे आधारस्तंभ – संजय राऊत
- फास्टॅगसाठी ‘हीच’ अंतिम तारीख; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती
- राज्यपालांसोबत शीतयुद्ध नाही, तर खुलं वॉर सुरु आहे – संजय राऊत
- IndvsEng : पराभवानंतर दुसऱ्या कसोटीत भारताची भक्कम स्थिती !
- उद्यापासून महाविद्यालये सुरु ; पुण्यात अभाविप करणार ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत


