मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद पहिल्या दिवसापासून सुरु आहे. मग ते शपथविधी दरम्यान घेतलेल्या नेत्यांच्या नावावरुन असो वा आता रखडलेल्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन असो, हा वाद वाढतच आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नव्हती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली होती. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटल्याचे सद्या दिसून येत आहे.
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपालांना लक्ष्य केलं आहे. राज्यपालांसोबत शीतयुद्ध सुरु नाही तर खुलं वॉर सुरु आहे. तर, राज्य सरकारचे अनेक निर्णय राज्यपालांमुळे रखडले असून ते भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतुन केला आहे.
‘राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारसी स्वीकारणे हे राज्यपालांना बंधनकारण आहे असं राज्यघटना सांगतेय. असं असतानाही राज्य सरकारने शिफारस केलेल्या 12 आमदारांचा निर्णय राज्यपालांनी प्रलंबित ठेवलाय. ही घटनेची पायमल्ली आहे. याचा अर्थ राज्यपाल हे राजकीय दबावाखाली काम करत आहेत, म्हणून हे खुलं युद्ध आहे, शीतयुद्ध नाही.’ अशी टीका संजय राऊत यांनी राज्यपालांवर केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रातील सत्ता गेल्यानंतर भाजपला देखील आंदोलने करावी लागतील; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा
- अंकिताने साजरा केला बॉयफ्रेंड विकी सोबत असा ‘व्हॅलेंटाईन डे’
- बाळासाहेबांचा शब्द बॉलिवूड मध्ये होता आदेश, मात्र उद्धव ठाकरे सत्तेवर येताच का बिनसलं नात !
- मुंबई इंडियन्सने उघड केले रोहित शर्माच्या याच्या शतकी खेळीचे ‘व्हॅलेंटाईन डे’ कनेक्शन
- ‘लव इज इन द एयर’, मलायकाने अर्जुनला व्हॅलेंटाईन डेच्या दिल्या खास शुभेच्छा


