Share

फास्टॅगसाठी ‘हीच’ अंतिम तारीख; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती

Published On: 

नागपूर : देशातील टोल वसुली सुलभ आणि रहदारी सुरळीत करण्यासाठी सरकारकडून फास्टॅग प्रणालीराबवण्यात येत आहे. २०१७ पासून, नवीन चार चाकी वाहनांच्या नोंदणीसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आले होते. तर, याआधी खरेदी करण्यात आलेल्या वाहनांसाठी, टोलनाके, बँका यासह फास्टॅग केंद्रे देखील निर्माण करण्यात आले आहेत. यासोबतच, फास्टॅग ऑनलाईन पद्धतीने देखील काढण्याची सोय करण्यात आली होती.

अनेकवेळा अंतिम तारखा देऊन देखील अनेक वाहनधारकांनी फास्टॅग लावले नसल्याचे दिसून आले होते. यामुळे गैरसोय टाळण्यासाठी फास्टॅग अनिवार्याची मुदत वाढ करून देण्यात आली होती. तर, टोलनाक्यांवर देखील विना-फास्टॅग लेन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामुळे विना-फास्टॅग लेन/ कॅश लेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून आले.

केंद्र सरकारने १५ फेब्रुवारी ही अंतिम तारीख दिल्याचे जाहीर केले होते. यातही मुदतवाढ मिळेल अशी अपेक्षा काही वाहनधारक करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अद्यापही त्यांनी फास्टॅग लावले नसून केंद्र सरकारने मात्र आता अंतिम तारीख वाढणार नसल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे.

पथकर नाक्यावर वाहनांची कोंडी टाळणे व महामार्गावरील अखंड वाहतुकीसाठी फास्टॅग प्रणालीला आता मुदतवाढ दिली जाणार नाही, असं नितीन गडकरी यांनी जाहीर केलं आहे. ‘फास्टॅगसाठी यापूर्वी २-३ वेळा मुदतवाढ दिली. ८० ते ९० टक्के मार्गावर हा प्रयोग यशस्वी झाला आहे. दहा टक्के शिल्लक आहेत. यापुढे मुदत वाढवणार नाही. सर्व पथकर नाक्यावर व अन्य ठिकाणी फास्टॅग आहे. त्यामुळे वाहनधारकांनी तत्काळ खरेदी करावी,’ असं आवाहन देखील गडकरींनी केलं आहे. यासंदर्भात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्त दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!