🕒 1 min read
पुणे : जवळपास ११ महिन्यांपासून बंद असणारे महाविद्यालयांची दारे आता विद्यार्थ्यांसाठी अखेर खुले होणार आहेत. उच्च शिक्षणाचे महाविद्यालये नेमके कधी सुरु होणार याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये अनेक दिवस संभ्रम होता. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अखेर याबाबत मागील आठवड्यात निर्णय घेतला. व येत्या १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु करणार असल्याची घोषणा सामंतांनी केली.
जवळपास ११ महिन्यांनंतर विद्यार्थी आता महाविद्यालयामध्ये येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुढे सरसावली आहे. विद्यार्थी परिषद उद्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये दुपारी १२ वाजता मुख्य कमानी जवळ ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री शुभम भूतकर यांनी दिलेली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतांना, टप्याटप्याने जनजीवन सुरळीत होत होते . मात्र गेले अनेक दिवस वरीष्ठ महाविद्यालये बंद होते महाविद्यालये तात्काळ सुरु करावेत, या मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी अभाविप ने मागील महिन्यापासून राज्यव्यापी आंदोलन छेडले होते. यानंतर काही कालावधीतच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान कोरोना प्रादूर्भाव असेपर्यंत ऑनलाइन परीक्षेचा पर्याय उपलब्ध असेल. तसेच ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा द्यायची असेल त्यांच्यासाठी ऑफलाइन परीक्षा देण्याची सोय करता येईल. असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शनिवारी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रातील सत्ता गेल्यानंतर भाजपला देखील आंदोलने करावी लागतील; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा
- अंकिताने साजरा केला बॉयफ्रेंड विकी सोबत असा ‘व्हॅलेंटाईन डे’
- राज्यपालांसोबत शीतयुद्ध नाही, तर खुलं वॉर सुरु आहे – संजय राऊत
- IndvsEng : पराभवानंतर दुसऱ्या कसोटीत भारताची भक्कम स्थिती !
- ठाकरे सरकारच्या राज्यात महिला खरंच सुरक्षित आहेत का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
