चेन्नई : चेन्नईमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड संघात कालपासून दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दिवसाखेर ८८ षटकात ६ बाद ३०० धावा केल्या. या धावसंख्येपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली आहे. परंतु दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडच्या गोलंदाजांनी तळातील भारतीय फलंदाजांच्या पटापट विकेट काढल्या. त्यामुळे ९५.५ षटकात ३२९ धावांवर भारताचा पहिला डाव संपुष्टात आला.
यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी उतरला. मात्र, दुसरा दिवस हा भारतीय संघाच्या पारड्यात पडला. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या १३४ धावांवर बाद झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाची स्थिती भक्कम झाली आहे. फिरकीपटू आर. अश्विनने चार विकेट्स मिळवल्या. तर, अक्सर पटेलने ३ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला. मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर पहिला बळी घेतला. यासोबतच इशांत शर्माने देखील २ बळी मिळवत महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडलं.
विकेटकिपर बेन फॉक्स (१०७ चेंडूत ४२ धावा)वगळता इंग्लंडच्या फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. दरम्यान, भारतीय संघाकडे २३० हुन अधिक धावांची आघाडी असून दुसऱ्या डावाच्या फलंदाजीला सुरुवात देखील झाली आहे. सद्या, रोहित शर्मा व शुभमन गिल खेळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रातील सत्ता गेल्यानंतर भाजपला देखील आंदोलने करावी लागतील; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा
- अंकिताने साजरा केला बॉयफ्रेंड विकी सोबत असा ‘व्हॅलेंटाईन डे’
- राज्यपालांसोबत शीतयुद्ध नाही, तर खुलं वॉर सुरु आहे – संजय राऊत
- बाळासाहेबांचा शब्द बॉलिवूड मध्ये होता आदेश, मात्र उद्धव ठाकरे सत्तेवर येताच का बिनसलं नात !
- पोलीस दबावात काम करतात अशी पद्धतच नाही, थोरातांनी फेटाळला फडणवीसांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

