मुंबई : पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरुन पूजाने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून जीवन संपवल्याचा संशय भाजप नेत्यांनी केला आहे.
या प्रकरणात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे. एवढेच नाही तर पूजा चव्हाण यांच्या संवादाच्या टेप्स बाराखडी पोलिसांकडे दिल्या असल्याचेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान, संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर बंजारा समाज देखील एकवटल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी बंजारा समाजाची बदनामी केली जात असल्याचे बंजारा समाज मोर्चा आयोजकांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणी भाष्य केलं आहे. ‘ संजय राठोड यांच्या विषयी बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पण राजकारणात एखाद्या व्यक्तीच्या बळी घेणं, बदनाम करणं असे प्रकार वाढले आहे. यामुळे सरकारला त्रास होईल असं विरोधकांना वाटत आहे,’ असं म्हणत राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे.
पुढे ते म्हणाले, ‘संजय राठोड हे विदर्भातील सेनेचे आधारस्तंभ आहे. विदर्भातील ते मोठे नेते आहे. या प्रकरणी विरोधी पक्षाने ठरवलं म्हणून त्या दिशेने चौकशी करायची असं होत नाही,’ असं देखील संजय राऊत यांनी रोखठोकपणे सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रातील सत्ता गेल्यानंतर भाजपला देखील आंदोलने करावी लागतील; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा
- फास्टॅगसाठी ‘हीच’ अंतिम तारीख; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती
- राज्यपालांसोबत शीतयुद्ध नाही, तर खुलं वॉर सुरु आहे – संजय राऊत
- IndvsEng : पराभवानंतर दुसऱ्या कसोटीत भारताची भक्कम स्थिती !
- उद्यापासून महाविद्यालये सुरु ; पुण्यात अभाविप करणार ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत


