Share

जे माजी मुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील ‘अशक्यप्राय’ वाटणारी गोष्ट करुन दाखवली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा देवेंद्र फडणवीस यांनाही जे जमलं नव्हतं ते उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं. मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच जागी, ठाण मांडून बसलेल्या तब्बल ३०० अधिकाऱ्यांची फेरबदली केली आहे. हे अधिकारी अनेक वर्ष एकाच विभागात तळ ठोकून होते. त्यामुळे एखाद्या सचिवापेक्षाही जास्त ‘पॉवर’ हे अधिकारी दाखवत होते. टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील ३०० अधिकाऱ्यांची फेरबदली केली आहे. मंत्रालयातील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात तळ ठोकून होते. ते केवळ खात्यांचे सचिवच नव्हे तर कॅबिनेट सदस्यांपेक्षाही अधिक प्रभावशाली झाले होते. कोणतेही कॅबिनेट सदस्य त्यांना बदलू शकत नव्हते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ते प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आले. प्रदीर्घ विचारानंतर, मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करून मंत्रालयातील ३०० अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

यापूर्वी, देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांसारख्या माजी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यामध्ये ते यशस्वी झाले नव्हते. आता उद्धव ठाकरे यांनी हे करुन दाखवलं आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्त्वाची मदत केल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!