मुंबई – महाराष्ट्रातील शाळा सुरु होणार की नाही याबाबत सत्ताधारी पक्षांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येत असताना दुसरीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये आता हळूहळू शाळा सुरु केल्या जात आहेत.उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,गुजरात, दिल्ली सह आणखी काही राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यातील शाळा नेमक्या सुरु होणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत अशा सूचना देण्यात आल्या असून तसा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल असेही अजित पवार म्हणाले. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत असे पवार यांनी सांगितले.
दुसऱ्या बाजूला शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारचा विचार सुरु असून त्यासंदर्भात लवकरचं निर्णय होईल, असं मंत्री बच्चू कडू म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे, मात्र इतर राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, असंही बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं. शाळा सुरु करण्यासाठी टास्क फोर्सच्या सूचना लक्षात घेऊन एसओपीत बदल केल्यानंतर नवी कार्यप्रणाली जाहीर केली जाणार आहे असं देखील त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा; न्यायालयाची सरकारला कायदा करण्याचा सूचना
- गणेश मंडळांनी मतदार जनजागृती कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा; पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- लवकरच भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला जेम्स बाँड सिरीजमधील २५ वा चित्रपट
- ‘उघड दार उद्धवा आता…’; मनसेचे मंदिरे उघडण्यासाठी पुण्यात जोरदार आंदोलन
- एसटी तिकीट यंत्र खरेदी गैरव्यवहार प्रकरणी आज लोकायुक्तांपुढे सुनावणी


